पांढरपेशी भिकारी गरजवंतांच्या मूळावर           

     दुपारच्या दरम्यान मी नेहमीची वर्तमानपत्रे आणण्यासाठी अकलूजच्या एसटी स्टँडवर गेलो होतो. त्यावेळी मी एसटी स्टँडची पायरी चढताच माझ्यासमोर हातात घड्याळ, साधा मोबाईल व डोळ्यावर चष्मा घातलेला एक गृहस्थ हात जोडत पुढे आला. त्यानंतर तो म्हणाला की, "मला पिलीवमधील पाहुण्यांकडे जायचे असल्याने मी इंदापूरहून अकलूजला येत होतो, त्यावेळी माझे पैशाचे पाकीट पडले. तरी आपण मला निमगांवला जाण्यापुरते फक्त २० रूपयेच द्या." तेव्हा मला ही व्यक्ती खरंच अडचणीत आहे असं वाटून मी त्याला "बर ठीक आहे" असं म्हणून २० रूपये देण्यासाठी खिशातून पैसे काढताना त्याला ५० रूपयाची नोट दिसली. त्यावेळी त्याने "मी पेन्शनर आहे, तुम्ही मला ५० रूपये दिले तर मी तुम्हाला २ दिवसांनी इथे येऊन ५० रूपये परत करीन" असं म्हणाला. मात्र मी त्यास २० रूपयेच देऊन पेपर स्टॉलकडे निघालो आणि पेपर घेऊन एसटी स्टँडच्या बाहेर गाडीवर बसून निघालो. त्यावेळी तीच व्यक्ती आणखी एका व्यक्ती समोर हात जोडून उभी राहिलेली दिसली. तेव्हा पांढरपेशात वावरणार्या या भिकार्याचा मला खूपच राग आला तरीही मी त्या व्यक्तीला काहीच न बोलता तेथून निघून गेलो. मात्र जाता जाता अशा या पांढरपेशी ढोंगी भिकार्याबद्दल मनात अनेक विचार घोंगावत असतानाच हे पांढरपेशी भिकारी खर्या गरजवंत भिकार्याच्या मूळावर उठत असल्याने खूपच वाईट वाटले. काही दिवसांपूर्वी व्हाटस् ॲपवर एक फोटो आला होता. त्यात एका व्यक्तिला दोन्हीही हात नसताना ती व्यक्ती खांद्यावर सामान अडकवून काम करीत असल्याचे दाखविले होते तर एक व्यक्ती दोन्ही हातपाय चांगले असतानाही रस्त्यावर भीक मागताना दाखवून या चित्राच्या माध्यमातून चित्रकाराने या पोटार्थी भिकार्यांचा चांगलाच समाचार घेतला होता. महाराष्ट्रात आजही अनेक लोक मोठ्या मनाने गोरगरीब गरजू लोकांना मदत करीत असतात. पण अशा ढोंगी भिकार्यांना पाहून या लोकांचा खर्या गरजू भिकार्यांवरीलही विश्वास उडत आहे. त्यामुळे खर्नाया गरजू भिकार्यांकडेही संशयाने पाहून त्यांना सहसा कोणी मदत करायला पुढे येत नाही.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

प्रांताधिकारी विजया पांगारकर यांच्या शुभहस्ते खंडकरी शेतकऱ्यांना एक एकरपर्यंत जमिनींचे वाटप

पुणे महानगपालिकेचे आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे व संबंधित दोषींची सीबीआय व ईडीमार्फत चौकशी होऊन बदली व्हावी (कामगार विभाग भाग -१)