पोस्ट्स

मे, २०१७ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
इमेज
पांढरपेशी भिकारी गरजवंतांच्या मूळावर                  दुपारच्या दरम्यान मी नेहमीची वर्तमानपत्रे आणण्यासाठी अकलूजच्या एसटी स्टँडवर गेलो होतो. त्यावेळी मी एसटी स्टँडची पायरी चढताच माझ्यासमोर हातात घड्याळ, साधा मोबाईल व डोळ्यावर चष्मा घातलेला एक गृहस्थ हात जोडत पुढे आला. त्यानंतर तो म्हणाला की, "मला पिलीवमधील पाहुण्यांकडे जायचे असल्याने मी इंदापूरहून अकलूजला येत होतो, त्यावेळी माझे पैशाचे पाकीट पडले. तरी आपण मला निमगांवला जाण्यापुरते फक्त २० रूपयेच द्या." तेव्हा मला ही व्यक्ती खरंच अडचणीत आहे असं वाटून मी त्याला "बर ठीक आहे" असं म्हणून २० रूपये देण्यासाठी खिशातून पैसे काढताना त्याला ५० रूपयाची नोट दिसली. त्यावेळी त्याने "मी पेन्शनर आहे, तुम्ही मला ५० रूपये दिले तर मी तुम्हाला २ दिवसांनी इथे येऊन ५० रूपये परत करीन" असं म्हणाला. मात्र मी त्यास २० रूपयेच देऊन पेपर स्टॉलकडे निघालो आणि पेपर घेऊन एसटी स्टँडच्या बाहेर गाडीवर बसून निघालो. त्यावेळी तीच व्यक्ती आणखी एका व्यक्ती समोर हात जोडून उभी राहिलेली दिसली. तेव्हा पांढरपेशात वावरणार्या या भिकार...
इमेज
भंगार बसेस बनल्या प्रवाशांची डोकेदुखी               मी शनिवारी पुण्यातील कैलिडस मिडीया सेंटरमध्ये टीव्ही रिपोर्टींग व अँकरिंगच्या क्लासला गेलो होतो. या दरम्यान पुण्याला जाताना एसटी बसने प्रवास करीत होतो. मात्र बसमध्ये बसल्यानंतर खिडक्यांच्या धडधड करणाऱ्या आवाजाने अक्षरशः कानठळ्या बसत होत्या. एसटी महामंडळाचा प्रवास प्रवाशासाठी सुरक्षित असल्याने अनेक लोक खाजगी वाहनांपेक्षा एसटी बसनेच प्रवास करतात. परंतु महामंडळ अशा भंगार झालेल्या बसेसची योग्य काळजी घेत नसल्याने प्रवाशांची डोकेदुखी वाढत आहे. त्यामुळे एसटी महामंडळाने जुन्या झालेल्या बसेस स्क्रैप करून प्रवाशांसाठी नवीन बसेस उपलब्ध करून द्याव्यात. तरच एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढेल