भंगार बसेस बनल्या प्रवाशांची डोकेदुखी       

     
मी शनिवारी पुण्यातील कैलिडस मिडीया सेंटरमध्ये टीव्ही रिपोर्टींग व अँकरिंगच्या क्लासला गेलो होतो. या दरम्यान पुण्याला जाताना एसटी बसने प्रवास करीत होतो. मात्र बसमध्ये बसल्यानंतर खिडक्यांच्या धडधड करणाऱ्या आवाजाने अक्षरशः कानठळ्या बसत होत्या. एसटी महामंडळाचा प्रवास प्रवाशासाठी सुरक्षित असल्याने अनेक लोक खाजगी वाहनांपेक्षा एसटी बसनेच प्रवास करतात. परंतु महामंडळ अशा भंगार झालेल्या बसेसची योग्य काळजी घेत नसल्याने प्रवाशांची डोकेदुखी वाढत आहे. त्यामुळे एसटी महामंडळाने जुन्या झालेल्या बसेस स्क्रैप करून प्रवाशांसाठी नवीन बसेस उपलब्ध करून द्याव्यात. तरच एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढेल


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

प्रांताधिकारी विजया पांगारकर यांच्या शुभहस्ते खंडकरी शेतकऱ्यांना एक एकरपर्यंत जमिनींचे वाटप

पुणे महानगपालिकेचे आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे व संबंधित दोषींची सीबीआय व ईडीमार्फत चौकशी होऊन बदली व्हावी (कामगार विभाग भाग -१)