पोस्ट्स

ऑगस्ट, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

हुकूमशाही भाजपने छाटले लोकशाहीवादी नितीन गडकरी यांचे पंख!

हुकूमशाही भाजपने छाटले लोकशाहीवादी नितीन गडकरींचे पंख! लोकप्रिय गडकरीवरील सूडाच्या राजकारणाचा भाजपलाच फटका बसण्याची शक्यता! अलीकडच्या काळात भाजपाने “काँग्रेसमुक्त भारत” असा नारा देऊन सूडबुध्दीच्या राजकारणाला सुरूवात केल्याने याबद्दल केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी तीव्र नाराजी व्यक्त करीत "आता राजकारण सोडून द्यावे असा विचार कधी कधी मनात येतो" असे वक्तव्य केले. त्यामुळे वर्णवर्चस्ववादी विचारांनी ग्रासलेल्या भाजपला त्यांचे हे लोकशाहीवादी विचार खटकल्याने हुकूमशाही भाजपने त्यांना संसदीय मंडळातून डावलून नितीन गडकरींचे पंख छाटले. मात्र आपल्या कर्तृत्वाने लोकप्रियतेच्या यशोशिखरावर पोचलेल्या गडकरीवरील सूडाच्या राजकारणाचा भविष्यात भाजपलाच फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.  एकीकडे “लवकरच देशातले इतर पक्ष अस्ताला जातील, प्रादेशिक पक्षसुध्दा संपतील व केवळ भाजप हा एकमेव पक्ष देशात शिल्लक राहील” असे भाजपातील पक्षश्रेष्ठी वादग्रस्त विधान करीत आहेत. तर दुसरीकडे ना. नितीन गडकरी “लोकशाहीत विरोधी पक्षाला कमालीचे महत्त्व आहे. त्यामुळे ही व्यवस्था अधिक सुदृढ होण्यासाठी काँग्रेस...