प्रांताधिकारी विजया पांगारकर यांच्या शुभहस्ते खंडकरी शेतकऱ्यांना एक एकरपर्यंत जमिनींचे वाटप
ॲड. सोमनाथ (आण्णा) वाघमोडे व भानुदास सालगुडे पाटील यांच्या अथक परिश्रमाला यश ॲड. सोमनाथ (आण्णा) वाघमोडे यांनी खंडकरी शेतकऱ्यांसाठी केलेले काम, फलटण-पंढरपूर रेल्वे, पालखी महामार्गातील बाधित शेतकऱ्यांचा प्रश्न, एमआयडीसी आदि कामे केली आहेत. त्यांची ही कामे व संघर्ष पाहून त्यांना नुकतेच दिल्ली येथे आंबेडकर ग्लोबल फाऊंडेशनने डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय भारत भूषण पुरस्काराने सन्मानित आहे. अकलूज (बंडखोर वृत्तसेवा): महाराष्ट्रात शेती महामंडळाच्या २७ हजार एकर जमिनींचे वाटप झाले असून माळशिरस तालुक्यात ६ हजार एकर जमीन वाटप करण्यात आली आहे. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून एक एकरपेक्षा कमी क्षेत्र असलेल्या जमिनींचे वाटप प्रलंबित होते, कारण तशी तरतूद नव्हती. परंतु खंडकरी शेतकऱ्यांचे नेते ॲड. सोमनाथ (आण्णा) वाघमोडे व भानुदास सालगुडे पाटील यांनी याप्रकरणी सातत्याने पाठपुरावा करून ज्यांचे एक एकरपेक्षा कमी क्षेत्र आहे अशा खंडकरी शेतकऱ्यांनाही शेती महामंडळाची जमीन मिळवून दिली आहे. यासाठी प्रांत अधिकारी विजया पांगारकर यांनीही सदरच्या फाईलींचा अत्यंत जलद गतीने निपटारा केल्यामुळे या लढ्याला लवकरच यश...