पुणे महानगपालिकेचे आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे व संबंधित दोषींची सीबीआय व ईडीमार्फत चौकशी होऊन बदली व्हावी (कामगार विभाग भाग -१)
पुणे (बंडखोर वृत्तसेवा): पुणे महानगरपालिकेतील कामगार कल्याण विभागाने अंदाजे तीन हजार कोटींचा घोटाळा केला असल्याचा संशय आहे. तसेच शिवाजी दौंडकर मुख्य कामगार अधिकारी, नितीन केंजळे कामगार कल्याण अधिकारी, प्रवीण गायकवाड, अमित चव्हाण, बुगप्पा कोळी, सुमेधा सुपेकर, माधवी ताठे, चंद्रलेखा घडाळे, सुरेश दिघे, आदर्श गायकवाड, लोकेश लोहोट प्रभारी उपकामगार अधिकारी हे पुणे महानगरपालिकेत बोगस पद्धतीने व चुकीची कागदपत्रे देऊन लागलेले असून यांनी पदोन्नती ही भ्रष्टाचारी मार्गाने मिळवलेली आहे. त्यामुळे या सर्वांची तात्काळ चौकशी करून यांना बडतर्फ करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत. पुणे महानगरपालिकेमध्ये कामगार कल्याण विभाग कार्यान्वित आहे. या विभागाचे कामकाज हे सर्व सेवकांमधील संबंध हे सलोख्याचे रहावे व सर्वांना समान न्याय मिळावा, कुठल्याही कामगारांवर अन्याय होऊ नये हे काम आहे. तसेच कामगारांच्या बाबतीतले सर्व निर्णय कामगार विभागाकडे येतात. त्याचे नियोजन, नियंत्रण व निर्मिती हे काम या विभागाकडे आहे. तसेच बडतर्फ करणे, अगर शिस्तभंगाची व इतर स्वरूपातील कामे ही सुद्धा कामगार कल्याण विभ...